आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ।।
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ।।ध्रु.।।
राघवे सागरात ।
पाषाण तारीले ।।
तैसे हें तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ।।१।।
आरती तुकाराम ।।
तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ।।
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ।।२।।
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ।।
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ।।
Comments
Post a Comment